अंमली पदार्थ विरोधी पथक -१ , गुन्हे शाखा , पुणे शहर ‘ ची कामगिरी.
पुणे, दि. ५( punetoday9news):- आंध्रप्रदेश मधून पुण्यात चारचाकीने येवून बसमध्ये चोरी करणाऱ्या चोरट्यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
मिळालेल्या बातमीनुसार पोलिसांनी स्वारगेट बस स्टॉप जवळ थांबलेल्या लाल रंगाच्या चारचाकीतून (क्र. के ए ०३ एन एफ १८२४) आरोपी नागेश आप्पाना (वय २५ वर्षे रा . मशिद कॉलनी, ता गुत्ते जि गतकुल, राज्य आंधप्रदेश) यास पकडले.
त्याची अधिक चौकशी केल्यावर त्याच्याकडे वेगवेगळ्या मोबाईल कंपन्यांचे एकुण ३८ मोबाईल, चारचाकी गाडी असा एकुण १४,८५,००० रु चोरीचा ऐवज मिळाला आहे.
त्याबाबत पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांनी प्राथमिक चौकशी करता , चौकशी मध्ये त्याने सदरचे मोबाईल हे कात्रज चौक , पुणे मन पा बस स्टॉप व इतर ठिकाणाहुन पी एम टी बसने प्रवास करणारे प्रवासी गर्दीत असल्याचा फायदा घेवुन त्याने व त्याच्या साथीदारांनी मिळुन चोरी केली असल्याचे सांगितले आहे .
त्या प्रमाणे अधिक चौकशी करुन शिवाजीनगर , भारती विदयापीठ व इतर पोलीस ठाण्यांमध्ये ०९ गुन्हे दाखल असुन मोबाईलच्या मालकांशी संपर्क करुन गुन्हयांचा तपास सुरु आहे .
सदरची उल्लेखनीय कामगिरी ही पोलीस आयुक्त पुणे शहर अमिताभ गुप्ता , पोलीस सह आयुक्त डॉ . रविंद्र शिसवे , अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे , गुन्हे , पुणे पोलीस उप आयुक्त , गुन्हे श्रीनिवास घाडगे , सहायक पोलीस आयुक्त , गुन्हे १ लक्ष्मण बोराटे यांचे मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथक – १ , गुन्हे शाखा पथकातील पोलीस निरीक्षक , विनायक गायकवाड , स.पो.नि. लक्ष्मण ढेंगळे व पोलीस अंमलदार , मारुती पारधी , पाडुरंग पवार , राहुल जोशी , प्रविण उत्तेकर , मनोज साळुंके , विशाल दळवी , विशाल शिंदे , रेहाना शेख , नितेश जाधव , योगेश मोहिते यांनी केली आहे .
Comments are closed