पिंपरी, दि. ५( punetoday9news):- पुणे, पिंपरी-चिंचवडकरांची चिंता वाढवणारी बातमी आहे . कारण दक्षिण आफ्रिकेतील ओमायक्रॉन या व्हेरियंटचे आठ रुग्ण पुण्यात आढळले आहेत .
यामध्ये पिंपरी चिंचवडमधील एकाच कुटुंबातील सहा जणांचा समावेश आहे . यात तीन लहान मुलांचा समावेश आहे . तर पुण्यातील एक आणि आळंदीमधील एका रुग्णाचा समावेश आहे .
रविवारी पुण्यात ओमायक्रॉन व्हेरियंटचे आठ रुग्ण आढळलेल्यामुळे महाराष्ट्रातील ओमायक्रॉन रुग्णाची संख्या नऊ झाली आहे . शनिवारी डोंबविलीमध्ये ओमायक्रॉनचा एक रुग्ण आढळला होता . पुण्यात आढळलेल्या रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे आहेत , त्यांच्यावर पालिकेच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत . कोरोनाच्या नवा व्हेरियंटने पुण्यात शिरकाव केल्यामुळे थोडी चिंता वाढवणारी बातमी आहे.
पिंपरी चिंचवडमधील एकाच कुटुंबातील सहा रुग्णांना ओमायक्रॉन व्हेरियंटची लागण झाली आहे . 24 नोव्हेंबर रोजी नायजेरियातून भावाला भेटण्यासाठी आलेल्या 44 वर्षीय महिलेला , तिच्यासोबत आलेल्या दोन मुलींना ओमायक्रॉनची लागण झाली आहे . त्याशिवाय त्या महिलेचा भाऊ आणि त्याच्या दोन्ही मुलींनाही ओमायक्रॉनची लागण झाली आहे . सर्वांना कोरोनाची सौम्य लक्षणे असून पिंपरी – चिंचवडमधील जिजामाता रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे . ओमायक्रॉन व्हेरियंटच्या सहा रुग्णापैकी तीन जण 18 वर्षांपेक्षा कमी वयाचे आहेत .
तर पुण्यातील 47 वर्षीय व्यक्तीलाही ओमायक्रॉन विषाणूची लागण झाली आहे . ही व्यक्ती काही दिवसांपूर्वी फिनलँड देशात गेली होती . 29 तारखेला त्या व्यक्ताला ताप आला होता . त्यामुळे त्या व्यक्तीनं कोरोना चाचणी केली . यामध्ये तो पॉझिटिव्ह आढळला होता . या व्यक्तीने कोविशिल्ड लस घेतली आहे . या व्यक्तीला कोणतीही लक्षणे नाहीत व प्रकृती स्थिर आहे . असे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे.
Comments are closed