कात्रज,दि.६( punetoday9news):- पुणे शहरातील कात्रज परिसरात गोळ्या झाडून काँग्रेस कार्यकर्त्याची हत्या करण्यात आली आहे . चंद्रभागा चौक परिसरात हा प्रकार घडला . भरदिवसा घडलेल्या या घटनेने परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे .
या घटनेतील मृत तरुणाला ६ गोळ्या घातल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे . समीर मणूर ( वय 40 ) असे मृत व्यक्तीचे नाव असून तो काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता असल्याची माहिती समोर आली आहे तसेच काही दिवसांपूर्वी त्याने आंबेगाव परिसरातील दत्तनगर मध्ये आमदार संजय जगताप यांच्या हस्ते संपर्क कार्यालयाचे उद्घाटन केले होते .
भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हददीतील चंद्रभागा चौकात हा गुन्हा घडला आहे . मृत समीर चौकात उभा असताना दुचाकीवरुन आलेल्या दोघा अज्ञातांनी समीरवर गोळीबार केला . अत्यंत जवळून समीर वर सहा गोळ्या झाडण्यात आल्या . या गोळाबारात समीर गंभीर जखमी झाला व मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला .
Comments are closed