बोपोडी,दि. ७( punetoday9news):- भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 65 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त बोपोडी परिसरात शांती यात्राचे आयोजन करण्यात आले होते.
शांती यात्राचे आयोजन गोदाई सोशल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष विनोद दादासाहेब रणपिसे यांनी केले असून यास भिमज्योत तरूण मंडळ, भिमज्योत महिला मंडळ, भिमज्योत स्पोर्टस् क्लब, रमाईमाता मंडळ, औधरोड यांचे सहयोग लाभले. शांती यात्राला संबोधित करताना विनोद रणपिसे म्हणाले की, “डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संपुर्ण भारताला बौध्द धम्माची शिकवण दिली आहे. बौध्द धम्म हा शांती मार्गाने जाणारा आहे. तरुण वर्गा सोबत सर्व स्तरातील नागरिकांनी शांतीचा मार्ग अवलंब करने गरजेचे आहे. हा संदेश सर्वत्र पोहचावा याच उद्देशाने आज शांती यात्राचे आयोजन करण्यात आले.”
बोपोडी येथील सर्व्हे नंबर 26 येथून शांती यात्रेची सुरुवात करण्यात आली. तेथून सर्व्हे नंबर 24, 25, बोपोडी गावठाण, महादेव मंदीर परिसरातून पुढे भाऊ पाटील रोड मार्गे या यात्रेचा समारोप बोपोडी औध रोड येथील आंबेडकर चौक येथे करण्यात आला.
Comments are closed