प्राधिकरण,दि.९( punetoday9news):- निगडी जागतिक दिव्यांग दिन व उडान दिव्यांग फौऊडेशन वर्धापनदिनानिमित्त औचित्य साधून प्राधिकरण येथील खान्देश मित्र मंडळाच्या सभागृहात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
त्यात दिव्यांगसाठी रोजगार विषयक माहिती सत्र , शासकीय योजनेची माहिती , दिव्यांग सशक्तिकरण शिबिर , कृत्रिम पाय , कॅलिपर, कुबड्या इतर तपासणी व मोजमापाचे शिबिर , दिव्यांग प्रणामपत्र यांची माहिती देण्यात आली त्याच बरोबर दिव्यांग क्षेत्रातील काम करणारे प्रतिनिधींचा सत्कार करण्यात आला त्यात दत्ता भोसले , राजेंद्र वाकचौरे , हरिदास शिंदे अशोक सोनावणे , रमेश शिंदे , विजु शिंगे , संजय धोंगडे , अर्चना गुंडरे , सारिका राजपुत , संदिप बारणे , पृथ्वीराज चव्हाण , नागेश काळे , किशोर दिघे , जीवन टोपे , धनजय कांबळे , नवीन खंडागळे , संजय डोईफोडे यांचा सत्कार करण्यात या कार्यक्रमाचे प्रमुख सतीश आचार्य, विजूअण्णा जगताप, बाप्पूअण्णा कातळे, गणेश बोत्रे, अशोक मगर, व मल्हार आर्मी शहर अध्यक्ष दीपक भोजने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय धोंगडे आणि संदीप बारणे यांनी व संस्थेचे अध्यक्ष आनंद बनसोडे यांनी प्रास्ताविक केले.
कार्यक्रमाच्या शेवटी दिव्यांग यांचा सांस्कृतिक कार्यक्रम व स्नेहभोजनाचा कार्यक्रम झाला कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष आनंद बनसोडे, सचिव बाळासाहेब तरस , रवी भिसे, हरेश्वर गाडेकर, योगेश सोनार, मोहम्मद रफी पटेल, प्रविण भोसले साईनाथ कांबळे सचिन खरात यांनी प्रयत्न केले आणि दिव्यांग बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments are closed