राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त कीर्तन सोहळ्याचे आयोजन.
पिंपरी, दि.९ (punetoday9news ) :- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपळे गुरव येथे युवा कीर्तनकार चैतन्य महाराज वाडेकर यांच्या भव्य कीर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
पिंपळे गुरव येथील शामभाऊ जगताप युवा मंच, तानाजी जवळकर सोशल फाउंडेशन व आदियाल स्पोर्ट क्लब यांच्या वतीने या कीर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून, येत्या शनिवारी (दि. 11 डिसेंबर) सायंकाळी 6.00 वाजता सृष्टी चौक (गार्डन मैदान) पिंपळे गुरव येथे हा सोहळा संपन्न होईल, अशी माहिती आयोजक राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहर कार्याध्यक्ष शामभाऊ जगताप, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष तानाजीभाऊ जवळकर व युवा नेते अमरसिंग आदियाल यांनी दिली.
Comments are closed