भुयारी मार्गात उतार व वळण असल्याने वाहनांवर नियंत्रण ठेवणे कठीण 

गतिरोधक , बहिर्वक्र आरसा , दिशासूचक फलक अत्यावश्यक . 

 पिंपळे सौदागर ,दि. ९ ( punetoday9news ):- पिंपरी चिंचवड शहरातील पिंपळे गुरव सुदर्शन नगर शेजारी नवीन झालेल्या भुयारी मार्गात बस व रिक्षाचा अपघात रिक्षा चालक जखमी झाला आहे. नवीन होत असलेल्या भुयारी मार्गात कामानुसार सातत्याने बदल होत असल्याने नवीन वाहन चालक बुचकळ्यात पडतात . 

मिळालेल्या माहितीनुसार  भोसरी ते हिंजवडी जाणारी बस चुकीच्या दिशेने या मार्गात अचानक आल्याने हा अपघात घडला असल्याचे निदर्शनास येत आहे . भोसरी येथून हिंजवडी फेज ३ कडे जाणाऱ्या  बस (एम एच १४ एच यु ५०४२) च्या चालकाने नव्याने झालेल्या भुयारी मार्गात रस्त्याच्या माहिती न समजल्याने चुकीच्या दिशेने वेगात बस चालविल्याने  समोरून येणाऱ्या प्रवासी रिक्षा (एम एच १४ एच एम ८३०२) ला समोरच्या बाजूने जोरदार धडक दिली.

यावेळी बस चालकाने प्रसंगावधान राखत ब्रेक दाबण्याचा प्रयत्न केला परंतू वेग व विरुध्द बाजूने आल्यामुळे बसवर चालकास नियंत्रण ठेवता आले नाही. अपघात मोठा असला तरी रिक्षा चालक जखमी असल्याचे प्रत्यक्षदर्शीनी माहिती दिली. या ठिकाणी नव्याने भुयारी मार्ग विकसित करण्यात येत असून जवळपास संपुर्ण काम पूर्ण होत आले असताना याठिकाणी दिशा दर्शक व सुरक्षा रक्षक नसल्याने सदर अपघात झाल्याचे दिसून येत असून बांधकाम करणाऱ्या कंपनी ठेकेदाराकडून कोणत्याही प्रकारची काळजी व इतर व्यवस्था नसल्याने वाहनचालकाना नक्की कोणत्या बाजूने जावे हे या ठिकाणी कळत नाही. याठिकाणी उतार व भुयारी मार्गाला वळण असल्याने या ठिकाणी कडक नियम व वेग नियंत्रण दिवे तसेच सूचना फलक लावण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

 

 

Comments are closed

error: Content is protected !!