?️ शासन आपल्या दारी’ उपक्रमातून नागरिकांना दिलासा.
?️ दीड हजारांहून अधिक नागरिकांना मिळाला लाभ .
?️ लाभार्थ्यांकडून समाधान व्यक्त.
पिंपळे गुरव ,९(punetoday9news):- पिंपरी चिंचवड शहरातील नगरसेवक व स्थायी समिती सदस्य शशिकांत कदम यांनी आमदार लक्ष्मणभाऊ जगताप व शंकरशेठ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली नागरिकांच्या सोयीसाठी मोफत दाखले उपक्रम हाती घेतला असून या उपक्रमास पिंपळे गुरव परिसरातील नागरिकांकडून उस्फुर्त प्रतिसाद मिळत असल्याचे दिसत आहे.
या दाखल्यांमध्ये प्रामुख्याने आधार कार्ड, मतदान कार्ड, पॅन कार्ड , रेशन कार्ड , ई श्रम कार्ड ,उत्पन्न दाखला ,विवाह नोंदणी दाखला, रहिवासी दाखला , नॉन क्रिमीलेयर , शॉप ऍक्ट ,जेष्ठ नागरिक असे विविध दाखले एकाच छत्राखाली देत आहेत. त्यामुळे विद्यार्थी, महिला, जेष्ठ नागरिकांची या दाखल्यांसाठी होणारी परवड कमी होऊन मोठा दिलासा मिळाला असल्याचे मत नागरिक व्यक्त करत आहेत.
शाळांमधील प्रवेशासाठी तसेच महाविद्यालयीन प्रवेशासाठी सध्या विद्यार्थ्यांना आणि पालकांना वेगवेगळ्या दाखल्यांची आवश्यकता भासते आहे. त्या बरोबरच विविध शासकीय योजनांचा लाभ मिळण्यासाठीही नागरिकांना अर्जाबरोबर दाखले जोडावे लागतात. अनेकदा दाखले मिळवण्यासाठी नागरिकांची धावपळ होते. नागरिकांची ही गरज लक्षात घेऊन स्थानिक नगरसेवक शशिकांत कदम यांनी शासन आपल्या दारी हा उपक्रम सुरू केल्याचे सांगितले.
Comments are closed